मित्रांनो ह्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला GCC TBC Marathi 30 WPM Passages Practice करीता देणार आहे.
GCC TBC Marathi 30 WPM Passages PDF For Practice :
Marathi 30 wpm Passage 1 :
जीवन म्हणजे एक कोरा चेक आहे. त्यावर सुखाची वाटेल तेवढी रक्कम लिहीणे हे मनुष्याच्या कक्षेत आहे. पण ती आशेच्या शाईने, हास्याच्या टिपत्रकागदाने टिपली पाहीजे. जीवनाविषयचे हे सुंदर तत्वज्ञान ऐकून मानवी मनाला सुखद धक्का बसेल हे जितके खरे आहे, तितकेच त्या जिवनात खोलवर दृष्टी टाकुन ठाव घेतो त्याला या जीवनात गुढतेचा वास्तववादी अर्थ कळतो.
जीवन म्हणजे वेल आहे व त्यावर सुख, दू:ख ही असणारी फुले आहेत. मग या दु:खाचे वाईट वाटण्याचे कारण नाही. जीवनात दु:ख आहे म्हणूनच सुखाची आपल्याला किंमत कळते. भट्टीत तापवून निघाल्याखेरील सोन्याला तेज चढत नाही. जगात अंधेरी रात्र आहे, म्हणुनच चंदाला महत्व आहे. सुखानंतर दु:ख आले तर त्याची लज्जत न्यारीच असते. जीवन म्हणजे सुख व दु:खाचा चित्रपट आहे. परीक्षेसाठी कष्ट केल्यानंतर निकालाच्या त्या आनंदाची खरीखुरी गोडी अनुभवता येते. तद्वत आपल्या जीवनात येणारी द:खे आपल्या व्यक्तीमत्वाची कसोटी घेण्यासाठीच येत असतात. अशावेळी दु:खाना सामोरे जावेच लागते.
Marathi 30 wpm Passage 2 :
आपले मन कधीच स्थिर नसते. एखाद्या दिवशी आपल्याला खूप प्रसन्न वाटते. एखाद्या दिवशी खूपच उदास वाटते. मन स्थिर नसेल तर कशातच लक्ष्ा लागणार नाही, कोणतेही काम नीट होणार नाही. आपले एखादे ध्येय ठरविले, मग ते अभ्यासाविषयी असो किंवा इतर काहीही. कधी आपल्याला वाटते हे आपण सहज साध्य करू तर कधी आपल्याला वाटते हे खूप अवघड आहे, हे साध्य करणे आपल्याला अशक्य आहे. आपले मन असे दोन्ही बाजूला हेलकावे घेत असते. माची ही दोलायमान अवस्थाही नैसर्गिकच असते. त्यामुळे घाबरून जायचे काहीच कारण नाही. मन प्रसन्न असते तेव्हा अभ्यास केला पाहिजे. मन प्रसन्न असेल तर कंटाळा अजिबात येणार नाही.
प्रसन्न मनातच चांगले विचार येत असतात, सकारात्मक विचार येत असतात. ध्येय गाठण्यासाठी हिंमत येत असते. मन प्रसन्न असेल तर कशाचिही भिती वाटत नाही. म्हणून आपले नेहमी प्रसन्न राहील, चित्तवृत्ती उल्हासित राहतील असा जाणिवपूर्वक प्रयत्न केला पाहीजे.
Marathi 30 wpm Passage 3 :
आपल्या मुलभूत गरजांपैकी निवाऱ्याची गरज ही आपल्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याची असते. अर्थात, त्याचं कारणही तसचं असत. ही गरत क्षणिक नसून कदाचीत आयुष्यभरासाठी सुद्धा अपेक्षित आणि उपयुक्त ठरत असते. अन्न आणि वस्त्र या दोन बाबी मात्र आपल्या केवळ काही क्षणाच्या गरजा भागविण्यापुरत्याच असतात, परंतू निवारा हा मात्र निरंतर असतो आणि त्यासाठी त्याचा निवाडादेखील व्हावा लागतो.
जेव्हा विषय घराचा असतो त्यावेळेला तो व्यक्तीगत स्वरुपाचा नसतो तर तो संपूर्ण कुटुंबाशी संबंधित असतो. परंतू अन्न आणि वस्त्र मात्र व्ययक्तीक गरजा भागविणाऱ्याच असतात. केवळ या दोन गरजांची पूर्तता व्यक्तीनुरूप ठरत असते. पण घराची निवड मात्र संपुर्ण कुटुंबासाठी असल्यामुळे ती व्यक्तीकेंद्रीत नसते. अन्न, वस्त्र निवडताना सवड महत्वाची असते. अनेकदा या निवडीमध्ये मर्यादा येतात त्या केवळ आर्थिक कुवतिमुळे. कारण या तीन गरजांमधून हीच गरज अधिक महाग असते. पण अन्न, वस्त्र मात्र तुलनेने कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतात.
Marathi 30 wpm Passage 4 :
येथील लोकांनी असे कळवले आहे की त्यांचे गाव वालदेवी नदीच्या काठी वसलेले आहे. गेल्या दीड-दोनशे वर्षा पासून ते या नदीतील पाणी शेतीच्या उपयोगासाठी वापरीत होते व आहेत.
या क्षेत्रात सैनिही केंद्र झाल्यामुळे बऱ्याच वर्षा पासून नदीच्या पाण्यात प्रवाह अडवला गेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल पासून पुढे पाण्याची टंचाई जाणवते याचा त्यांच्या पाटबंधाऱ्यावर देखील परिणाम झाला आहे. या पाण्याच्या वापरावर पाणीपट्टी बसवू नये व आर्थिक बोझा पडू नये, अशी या लोकांची विनंती आहे. या संबंधात, वालदेवी ही गोदावरी नदीची उपनदी असल्याचे पाटबंधारे अधिनियमाच्या कलम अनुसार अधिसूचित केले असे सांगण्यात आले आहे. एकदा नदी अधिसूचित झाली म्हणजे पूर्वीचे सर्व अधिकार नाहीसे केले जातात आणि पाटबंधारे विभागाकडून नदीचा पाणीपुरवठा नियंत्रित केला जातो. नदीच्या अधिसूचने नंतर पाटाचा उपयोग करणारे लोक पाटबंधारे अधिनियमाच्या 31 व्या कलमा नुसार नुकसान भरपाई मागू शकतात. नियमां प्रमाणे पाणीपट्टी वसूल विभागाला प्रतिबंध नाही.
Marathi 30 wpm Passage 5 :
कर्नाटकातील दक्षिण कॅनेरा हा जो जिल्हा आहे तो फारच आगळावेगळा आहे. येथे साक्षरतेचे प्रमाण फार मोठा आहे. येथे लोक उद्यमशील आहेत, कष्टाळू आहेत. कामाच्या शोधात ते जगभर जाऊन पाहोचले आहेत. आपापल्या भारतात किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एखादं उडप्याचं हॉटेल दिसलं, तर ते हमखास या दक्षिण कॅनरामधल्याच कोणीतरी चालू केलेलं असणार.
इन्फोसिस फाऊंडेशनचा एक ऊपक्रम आहे. प्रत्येक शाळेसाठी वाचनालय. या उपक्रमांतर्गत आम्ही बरेच वेळा सरकारी शाळांना पुस्तक रूपाने देनगी देत असतो. म्हणजे मग त्या शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींना अगदी लहान वयातच वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध होतात. यासाठी मी प्रचंड प्रवास करते विशेषता खेड्यापाड्यात आणि कन्नड भाषेत लिहीलेली विविध विषयांवरील पुस्तकं खेडयांमधील शाळांना देणगी म्हणून देते. या प्रवासामुळेच वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मुलांना नेमके काय वाचायला आवडंत, हे आता मला नीट समजू लागल आहे. साधारणपणे मी गावातील प्रत्येक शाळेला भेट देते. त्या अगदीच लहान असतात.
Marathi 30 wpm Passage 6 :
घर, ते ही स्वत:च्या मालकीचे, 2 – 4 खिडक्या आणि बाल्कनी असणारे असेल तर यासारखा अवर्णनीय आनंद दूसरा नाही. त्यातच बाल्कनी जरा प्रशस्त असेल तर सारख्या आकाराच्या लहान लहान कुंड्या ठेऊन बाल्कनीमध्ये छान बाग तयार करता येते. बसायवयास एक आरामखुर्ची आणि सोबत या आकर्षक कुंड्या. यामध्ये सकाळ-संध्याकाळचा वेळ किती सुंदर जातो हे अनुभवल्याशिवाय समजनार नाही.
जर बाल्कनी मोठी असेल तर आपण बागेची हौस निश्चितपणे पूर्ण करू शकतो. मात्र ती छोटी असेल तर आपल्या आवडीला थोडी मुरळ घालावीच लागते. अशावेळी डोळयासमोर उभ्या राहतात त्या खिडक्या, त्यांचाच उपयोग बागेची हौस पूर्ण करण्यासाठी करता येतो. आपल्या घराची छोटी खिडकी आपल्याला मोकळ्या हवेचा आनंद तर देतेच, पण त्याचबरोबर आपल्या मनातील एक सुंदर छानसा बागेची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्याची संधीसुद्धा देते. भरपूर प्रकाश आणि हवा येणारी खिडकी अशा बागेसाठी उत्तम.
घरात येणाऱ्या पाहुण्यांना व बच्चे कंपनीसाठी खिडकी हा वेगळा विरंगुळा आहे.
Marathi 30 wpm Passage 7 :
निरंजनची गुरूजींवर अपार श्रध्दा होती. तो वार लावून जेवणारा अनाथ मुलगा, पण खुप बुद्धीमान, प्रामाणिक, श्रध्दाळू आणि सदैव मनात समाज हिताची कळ कळ जागी होती. परिक्षेला जाताना त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. तेव्हा परिक्षेला जाण्याच उशीर होईल याची कळजी न करता तात्काळ तो दगळ बाजूला सारला. त्यावेळी त्याच्या मनात कोणी ठेच लागुन पडू नये, कोणाला इजा होऊ नये, कोणाचे प्राण जाउु नयेत हा वियार प्रभावी होता.
पूढे पुलावरून चालत असताना रेल्वेचा मोठा अपघात घडवून आणण्याचे अतिरेक्याचे कट-कारस्थान त्याच्या लक्षात आले. शेकडो निरअपराधी लोक मरण पावतील, हजारो लोक जखमी होतील, अनेक संसार ढासळतील, मुले अनाथ होतील. आजच्या पेपरचा अभ्यास भरपुर झाला होता. पण वाचवायचा प्रयत्न केल्यास परिक्षा हुकणार होती. स्टेसन तीन-चार किमी दूर होते. शिवाय वार लावलेल्या घरी जेवायला ही जायचे होते. स्वत:चे काळजी न करता त्याला लोकांचे प्राण वाचवणे हिताचे वाटले.
Marathi 30 wpm Passage 8 :
पेशव्यांच्या राज्याच्या उत्पन्नाचा विचार करीत असताना चौथाई व सरदेशमुखी या दोन बाबीपासून त्यांना सतत उत्पन्न मिळत असे ही महत्वाची गोष्ट आहे. चौथाईचे मुळ शिवकालाच्या पूर्वीचे होते. इ.स. 1579 मध्ये पोर्तुगीजांनी रामनगर कोळी राजास त्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातील मुलखांवर हल्ले करून लुटू नये म्हणून दरसाल चोथाई देण्याचे कबूल केले होते.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले राज्य बळकट करण्यासाठी शत्रूच्या प्रदेशातून पैसा वसूल केला. चौथाई व सरदेशमुखी या दोन बाबीपासून शिवाजी महाराजांना भरपूर उत्पन्न मिळत असे. शिवाजी महाराजांचे चौथाई वसूल करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. मुघलांबरोबर सतत युध्द चालम असतातना औरंगजेब सुध्दा औरंगजेब सुध्दा शिवाजी महाराजांच्या धोरणामुळे गोंधळून गेला. कारण त्याच्या प्रदेशातील लोकांना चौथाई द्यावी लागत असे. शिवाजी राजांनंतर संभाजी राजे, राजाराम व शिवाजी दुसरा यांच्याही करकिर्दीत मुघलाई मुलुखातील चौथाई अमलांची वहिवाट चालू होती.
Marathi 30 wpm Passage 9 :
प्राचीन काळापासून जुन्नर हे राजधानीचे शहर म्हणून भरभराटीस आले होते. संरक्षणाच्या दृष्टीने गावाभोवतालची भक्कम तटबंदी यामुळे व्यापारी, बारा बलूतेदार, कारागीर जुन्नरमध्ये झाले होते. जुन्याकाळी जुन्नरचे आतील जुन्नर व बाहेरील जुन्नर असे दोन भाग होते. बाहेरील भगात पणसुंबा, शुक्रवार, माईचा मोहल्ला, शिपाई मोहल्ला, कोथुळपुरा, शंकरपुरा, कल्याणपेठ, माळीवाडा, जाकीरपुरा, खलीलपुरा असे 13 पुरे होते.
आतील भागात चांभार आळी, कुंभार आळी, खाटीक आळी, ढोरवाडा, दलीतवस्ती, कासार आळी, शंकरपुरा, मुरलीधर आळी, महाजन आळी, सराई आदितवार, बुधवार पेठ, कागदीवाडा, कागदपुरा, मंगळवार असे पुरे होत यासर्व पेठा हत्ती, पणसुंबा, लालवेस, फाटक, आदिसवार, कथवार, फकीरपुरा ओतूर, दिल्ली, आग, नागझटी, अशा वेशींच्या आत होत्या.
विविध व्यवसाय करणाऱ्या नागरीकांचे जातीनिहाय पेठांची रचना होती. तेलाचा व्यापार चालणारी तेली बुधवार पेठ होती.
योजनांच्या अंमलबजावणीत लोकांचा सहभाग वाढला पाहीजे असे म्हटले आहे. सारे काही सरकारनेच करावे अशी वृत्ती लोकांमध्येही निर्मान झालेली आहे. योजना कार्यक्षमतेने राबविल्या जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवन आवश्यक आहे.
दारिद्रय निवारण जलद औद्योगिकीकरणाशी अटळपणे निगडीत आहे. सातव्या योजनेतील विकासाचा वेग पाव टक्के म्हणजे साहव्या योजनेतील उद्दिष्टाऐवढाच ठेवलेला आहे. यापेक्षा अधिक वेगाने आपण विकास करू अशा योजनांकारांनाच वाटते असे यातून सुचित होते. विकासाचा वेग वाढणार नसेल तर दारिद्रय निवारणासाठी पंतप्रधानांना हवे असलेले जलद औद्योगिकीकरण कार्यक्षमता व उत्पादकता वाढायला हवी. कितीही मोठ्या योजना आखल्या आणि त्यासाठी पैशाची तरतूद केली तरी आपल्यातले हे दोष करण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न जोवर होत नाहीत तोवर विकासाचा वेग वाढण्याची शक्यता कमी. अर्थात सारे काही सरकारवर सोडविण्याची नागरिकांची वृत्तीही बदलायला हवी.
Marathi 30 wpm Passage 11 :
वाचन हा अभ्यासाचा अतिशय महत्वाचा भाग आहे. अभ्यास करायचा म्हटले की आपण पाठ्यपुस्तक वाचतो. त्या नोट्स वाचतो किंवा गाईड वाचतो. बहुतेकांच्या बाबतीत तर अभ्यास करणे म्हणजे केवळ वाचणे एवढाच अर्थ अभिप्रेत असतो. अभ्यास चांगला करायचे म्हटले तर वाचायचे कसे याचा विचार करायला हवा. विद्यार्थ्यांना अभ्यास करा म्हटले की ते पुस्तक किंवा वही काढतात आणि वाचायला सुरूवात करा म्हटले की ते पुस्तक किंवा वही काढतात आणि वाचायला सुरूवात करतात. पण केवळ डोळ्यापुढे पुस्तक धरून वाचले म्हणजे अभ्यास केला असे होत नाही.
वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकदा एक भाग वाचायला घेतला की तो संपूर्ण् वाचून संपेपर्यंत पुस्तक खाली ठेवायचे नाही. हाती घेतलेला भाग पूर्ण वाचून संपेपर्यंत पुस्तक खाली ठेवायचे नाही. हाती घेतलेला भाग पूर्ण वाचून संपवून मगच जागचे हलावे. खूप विद्यार्थ्यांना पुस्तक हातात घेऊन वाचतांना आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायची सवय असते याला अभ्यास म्हणत नाही. हा फक्त वेळकाढूपणा झाला. कुणीतरी अभ्यास करायला सांगितले म्हणून तो कसातरी उरकून टाकायचा हे योग्य नाही.
Marathi 30 wpm Passage 12 :
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात एक किंवा दोन मुलं असतात. ही मुलं लहान असल्यापासून ती त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू असतात. माणसाच्या जीवनमानाची जसजशी प्रगत होत जाते. तसतशा सर्व व्यवहारांमध्ये भौतिक सुविधा वाढत आहेत आणि जगण्यातल्या कष्टांचं प्रमाण कमी होत आहे. त्यातूनही कुटुंबाची केंद्रबिंदू असणाऱ्या आपल्या मुलांना जास्तीत जास्त सुखसोयी पुरवाव्यात, याकडे पालकांचा कल असतोच. आपल्या बालपणी ज्या ज्या गोष्टींची अणीव भासली, त्या त्या सगळया गोष्टी आपल्या मुलांना देता याव्यात, यासाठी पालक प्रयत्नशील असतात.
बऱ्याचदा मुलांनी मागणी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना मिळत जाते. काही वेळा तर मुलांना मागणी करण्याची गरजही पडत नाही, इतक्या गोष्टी त्यांना मिळतात. शिवाय, प्रत्येक घरात एक किंवा दोनच मुलं असल्यानं प्रत्येकाला सगळ्या सुखसोयी पूरवल्या जात असतात. त्यामुळे एकमेकांबरोबरचं समयोजन, एकमेकांना सांभाळून घेण, स्वत:च्या भावना एकमेकांबरोबरच सोबत शेअर करणं अशा गोष्टी या मुलांना माहित नसतात.
COMMENTS