Passage 1:
अंजीर हा सैतुसाच्या जातीचे वृक्ष आहे. बाजारात सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. याचा वापर सुका मेवा म्हणून गोडपदार्थावर सजावटीसाठीही करता येतो. अंजीर पिकून कच्ची हि खाल्ली जातात. तसेच टी सुखवून हि खायला चालतात. अंजीर सर्वच किराणा दुकानांवर आरामाने मिळतात. याचा वापर सलाद म्हणूनही करता येतो.
अंजीरपासून अनेक फायदे आहेत. याचा वापर पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन आणि अस्थमा यांच्या उपचारासाठी केला जातो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचे नियमित सेवन केले जाते. आजारपणात याचे नियमित सेवन अनेक रोग बरे करतो. अंजीर हे एक मोसमी फळ आहे. आशिया खंडाच्या पश्चिमी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अंजीर आपल्याला मुख्यतः कोरडे आणि मोसमात ओलेही पाहायला मिळतात. अंजिरात तंतू जास्त प्रमाणात असतात. शोधणे असे माहीत झाले आहे कि, अंजिरात जास्त तंतू असल्यामुळे याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे आपल्या वजनालाही संतुलित ठेवण्यात मदत मिळते. आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहावर गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात, त्यामुळे वजन संतुलित राहते.
अंजीरातील बहुगुणी पोटयाशियम तत्व रक्त शुद्ध करणे तसेच रक्तातील शर्केरेची मात्रा नियंत्रित करतो. आपण आपल्या शरीरातील शर्करेची मात्रा तपासून पाहायला पाहिजे. पोट्याशियम तत्वयुक्त खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात, खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित होते. अंजीरातील प्रतिरोधक तत्व रक्तातील ग्लुकोज आणि शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मधुमेहापासून बचाव होतो. सुकी अंजीर क्याल्शीयमचा चांगला स्रोत मानल्या जाते. दैनंदिन जीवनात शरीरामध्ये खनिजांची मात्रांची कमी पूर्ण करण्यासाठी रोज १०० mg क्याल्शीयमची गरज असते त्यामुळे अंजिराचे सेवन लाभदायी आहे. शरीरातील क्याल्शीयमची कमतरता अंजीर पूर्ण करतो त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात अंजिराचे सेवन करणे जरुरी आहे.
Passage 2:
किवी चा आकार आणि चव दोन्ही वैशिष्टयपुर्ण आहेत. लहान मुले खुप आवडीने किवी हे फळ खातात कारण इतर फळांपेक्षा किवी अगदीच वेगळे आहे. शरीराला संतुलीत पोषण मिळण्याकरता सर्व त.हेची फळं आणि अन्न खाणं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक खाद्यान्नात वेगवेगळे गुणधर्म आणि ताकद असते. आपला आहार निश्चित करतांना ब.याच लोकांसोबत ही समस्या असते की ते ब.याच कमी खाद्यान्नाला आपल्या आहारात समाविष्ट करतात त्यामुळे त्यांना पुरेसे पोषण तत्व मिळत नाहीत. अभ्यासाअंती असे लक्षात आले की झोप न येण्याच्या समस्येवर किवी एक चांगला उपाय आहे. युवकांना आणि लहान मुलांना जर पुरेशी झोप येत नसेल तर किवी त्यावर एक उत्तम उपाय आहे. याच्या सेवनाने झोपेचा अवधी अगदी सहज वाढतो आणि कुठल्याही व्यत्ययाशिवाय तुम्ही गाढ झोप घेउ शकता. नैसर्गिक रित्या किवी क्षारयुक्त आहे या अर्थी हे खाण्याला आपल्याला थोडेसे आंबट देखील लागते. एक संतुलीत शरीर ते असते ज्यात PH चे चांगले संतुलन आहे यामुळे आपले शरीर सक्रीय, फ्रेशनेस ने पुर्ण, आणि आपल्या त्वचेला तरूण ठेवण्यात मदत मिळते. असे म्हंटल्या जाते की किवीत असणारे व्हिटामीन C आणि E आपल्या शरीरात अॅंटीआॅक्सीडेंट सारखे काम करते आणि त्वचेच्या दुर्दशेपासुन आपल्याला वाचवतात. या समस्येपासुन वाचण्याकरता आणि आपल्या त्वचेला संुदर ठेवण्याकरता किवीला आपल्या त्वचेवर लावावे.
आपल्याला नेहमी हे सांगण्यात आलं की लिंबु आणि संत्र सर्वाधीक व्हिटामीन C देणारी फळं आहेत. परंतु हे खोटे आहे कारण किवी फळाचे परिक्षणाअंती हे समजले की प्रत्येक 100 ग्रॅम किवीत 154 टक्के व्हिटामिन C चे प्रमाण आढळते जे लिंबु आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट आहे. व्हिटामिन C आपल्या शरीरात अॅंटीआॅक्सीडेंट च्या रूपात काम करतं आणि आपल्या शरीराला कॅंसर सारख्या भयावह रोगापासुन वाचवते तसेच व्हिटामीन ब् शरीराच्या रोग प्रतिकाराक क्षमतेला देखील वाढवण्यास साहायक आहे.
Passage 3:
नारळाच्या तेलाचा उपयोग तुम्ही केवळ एक softness देणाऱ्या क्रीमप्रमाणेच नाही तर लोशन प्रमाणे सुद्धा वापर करू शकता. नारळाचे तेल रोज वापरल्याने तुम्ही आपल्या डोळ्यांच्या समस्या सुद्धा दूर करू शकता. नारळाच्या तेल तुमच्या ओठांना सर्वात आकर्षित सुद्धा बनवू शकते, तुम्ही आपल्या कोरड्या-सुकलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावू शकता. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी नारळाचे तेल सर्वोत्तम नरमाई देणाऱ्या क्रीमप्रमाणे काम करते, विशेष करून कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल अमृता प्रमाणे असते. आपल्या कोरड्या त्वचेला मुलायम करण्यामध्ये नारळाचे तेल सहायक ठरते. आंघोळीच्या 20 मिनीट पहिले नारळाच्या तेलास आपल्या शरीरावर लावावे आणि नंतर याला हिरव्या हरभऱ्याच्या पिठाच्या सहाय्याने धुवून घ्यावे. कधीही शरीरावर जास्तीत जास्त साबणाचा उपयोग करू नये कारण साबणामुळे शरीराची नरमाई कमी होत जाते. नारळाच्या तेल तुमच्या ओठांना सर्वात आकर्षित सुद्धा बनवू शकते, तुम्ही आपल्या कोरड्या-सुकलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावू शकता.
नारळाच्या तेलास तुम्ही मेकअप रिमूवर प्रमाणे सुद्धा उपयोग करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील किंवा डोळ्यावर लावलेले मेकअप सहजपणे काढू शकता. नारळाचे थंड्या तेलाचे काही थेंब रोज़ तुम्ही रोज तुमच्या डोक्यातही टाकू शकता आणि उपयोग करू शकता.
Passage 4:
लवंग खाण्याचे फायदे अनेक आहेत त्यापैकीच एक म्हणजे लवंग खाल्याने अन्न पचन होण्यात सहाय्य होते. जेवणानंतर लवंग चे सेवन केल्याने पचन सुरळीत होते व याशिवाय ऍसिडिटी, पोट फुगणे या गोष्टींपासून देखील सुटका होते. लवंगमध्ये असलेले युजेनॉल दम्याच्या समस्येत उपयोगी मानण्यात येते. एका शोधानुसार, हा घटक अँटिअस्थमेटिक असल्याने दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना याची मदत मिळते. यामधील ब्रोन्कोडायलेटर आणि इम्यनोमॉड्युलेटरी गुणांमुळे दम्याच्या लोकांना फायदा मिळतो. लवंग तेलाचा सुगंध नाकातील नळी साफ करण्यास मदत करतो. तसेच दमा, खोकला, सर्दी, सायनस यासारख्या समस्याही लवंग ने बऱ्या होतात. लवंग मध्ये अंटी बॅक्टेरियल व अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तोंडातील सत्तर टक्क्यांहून अधिक जंतूंचा नाश लवंग द्वारे होत असतो. म्हणूनच बऱ्याचशा टूथपेस्ट मध्ये लवंग चा वापर केलेला असतो. सोबतच लवंग ही तोंडातील दुर्गंध देखील दूर करते, म्हणून ज्या लोकांना तोंडातील दुर्गंध चा त्रास होत असेल त्यांनी दर रोज सकाळ संध्याकाळ दोन ते तीन लवंग तोंडात चघळावेत. या उपायाने तोंडातून जंतू नाहीसे होतील आणि दुर्गंधी पासून मुक्ती मिळेल. या शिवाय तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणूनही आपण लवंग चा उपयोग करू शकतात.
लहानपणी आजी आजोबा सर्दी खोकल्यात लवंग खाण्याची सल्ला देत असत. खोकल्याने होणारी गळ्यातील खसखस लवंग खाल्याने दूर होते. याशिवाय लवंग सोबत अद्रक घालून काढा करून प्यायल्याने छाती मोकळी होऊन सर्दी खोकल्यावर आराम मिळतो.
Passage 5:
गर्भावस्थे दरम्यान शतावरी चा उपयोग केला जाऊ शकतो. यामध्ये असलेले फोलेट गर्भवती महिलेच्या शरीरात फोलेट ची पूर्णतः करते. फोलेट हे एक आवश्यक पोषक तत्व असते, जे गर्भवती महिलेसोबतचा तिच्या गर्भात असलेल्या भ्रूण च्या आरोग्यासाठी देखील आवश्यक असते.गर्भवती महिलेने शतावरी, सौंठ, अश्वगंधा, ज्येष्ठमध व भूंगराज इत्यादींना एकत्रित करून त्यांचे चूर्ण बनवावे व ते चूर्ण 1 ते 2 ग्राम इतक्या प्रमाणात घेऊन बकरीच्या दुधासोबत सेवन करावे. असे केल्याने गर्भावस्थेतील शिशू चे स्वास्थ्य चांगले राहते हे चूर्ण दररोज पाच ग्रॅम पेक्षा जास्त सेवन करू नये व याशिवाय याविषयी एकदा डॉक्टरांशी चर्चा देखील नक्की करावी. अनेक महिला आई झाल्यावर त्यांना स्तनात दूध न येण्याची समस्या असते. अश्या स्थितीत महिला 10 ग्राम शतावरी जड चे चूर्ण दुधासोबत सेवन करू शकतात. असे केल्यास त्यांच्या स्तनात दुधाची वृद्धि होऊ लागेल. महिलांसाठी शतावरी चे अनेक फायदे आहेत म्हणून डिलीवरी झाल्यावर त्यांना शतावर सेवनाचा सल्ला दिला जातो. शतावरी एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे जी आपल्या आयुर्वेदिक गुणधर्मां साठी जगभरात प्रसिद्ध आहे. शतावरी च्या रोपाच्या उपयोग अनेक औषधी बनवण्यासाठी केला जातो. शतावरी तीन रंगांमध्ये आढळते ज्यामध्ये पांढरा हिरवा आणि जांभळा रंग समाविष्ट आहे. शतावरी चा उपयोग अनेक शारीरिक समस्यांसाठी केला जातो. शतावरी कल्प हे चूर्ण च्या रूपात उपलब्ध असते.
जर तुम्हाला GCC TBC Marathi 40 WPM Passage PDF बद्दल आटिकल आवडला अशेल तर नक्की ह्या आर्टिकल ला आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.
COMMENTS