राज्य सरकारने महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच नाव आहे “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना(Chief Minister Ladki Bahin Yojana). या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रूपये दिले जाणार आहेत.
महाराष्ट् राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित. विधवा.
घटस्पोटीत. निराधार महिलांना याचा फायदा मिळणार आहे. 
एका कुटुंबातील
किती लोकांना मुख्यमंत्री लाडली बहीन योजनेचा लाभ घेता येणार:
एका कुटुंबातील दोन महिलांना मुख्यमंत्री लाडली बहीन योजनेचा
लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे.
मुख्यमंत्री
लाडली बहीन योजनेचा कोणाला नाही मिळणार लाभ:
ज्या कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना या योजनेचा
लाभ मिळणार नव्हता पण आता हे अट काढून टाकली आहे. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा
जास्त आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत
१५०० रूपयांपेक्षा जास्त अनुदान घेत असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार
नाही, अशा महिलांनी या योजनेचा अर्ज भूर नयेत.
मुख्यमंत्री
लाडली बहीन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.अधिवास प्रमाणपत्र( नविन अपडेट नुसार आता नसेल तरी चालेल)
३.शाळा सोडल्याचा दाखला
४.जन्म प्रमाणपत्र
५.उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळा किंवा केशरी रॉशनकार्ड
६.हमीपत्र
७.बँक पॉसबूक
८.महिलेचा जन्म जर इतर राज्यातील असेल तर पतीचे कागदपत्र
– रॉशनकार्ड, जन्माचा दाखला, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला
मुख्यमंत्री
लाडली बहीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज् कसा करायचा:
अर्ज करण्याची पध्दत खुपच सोपी आहे, कोणीही घरी बसून या योजनेसाठी
अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये “नारीशक्ती दूत” ॲप डाऊनलोड करायचा आहे आणि अर्ज भरायचा आहे.
सगळ्या प्रमाणपत्रांची तुम्हाला मोबाईलमधे फोटो घेउुन घ्यायची
आहे किंवा तुम्ही लाईव्ह फोटो सुध्दा घेऊ शकता. प्रमाणपत्रांचा साईझ ५ एम बी पेक्षा
जास्त असायला नको नाही तर ते अपलोड होणार नाही.
या योजनेसाठी अजूनपर्यत कोणतीही ऑफिसियल वेबसाईट नाही, तुम्हाला
नारीशक्ती दूत ॲप द्वारेच अर्ज करावा लागेल.
अर्ज भरण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा:
१.       सर्वप्रथम
तुम्हाला मोबाईल वर नारीशक्ती ॲप डॉऊनलोड करावा लागेल व त्यावर प्रोफॉईल तयार करावी
लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच नाव, ईमेल, मोबाईल, जिल्हा, तालूका आणि नारीशक्ती प्रकार
म्हणजेच विवाहीत, अविवाहित, गृहीनी, सामान्य महिला इ. ची माहिती भरून प्रोफाईल तयार
कराव लागेल.
२.       प्रोफाईल
तयार झाल्यानंतर तुम्हाला मुख्य स्क्रीनवर वेगवेगळया योजनांची यादी दिसते त्यामधून
तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना वर क्लिक करायच आहे.
३.       क्लिक
केल्यानंतर अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आपली सगळी माहिती अचूक भरायची आहे, बॅक
अकाऊंच ची डिटेल्स अचूक भरायची आहे आणि सर्व डॉकूमेंट व्यवस्थित अपलोड करायची आहेत
आणि अर्ज सबमिट करायचा आहे.
४.      जर
तूमचा अर्ज सबमिट होत नसेल तर तुम्हाला पुन्हा रात्रीच्या वेळी अर्ज सबमिट करून बघायच
आहे, कारण सरवर बिझी असल्यामुळे होऊ शकते अर्ज सबमिट झाला नसेल.
मुख्यमंत्री लाडली बहीन योजना हमीपत्र:
मुख्यमंत्री लाडली बहिन योजनेसाठी लागणारे हमीपत्र खाली दिले
आहे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये त्याला डॉउनलोड करू शकता.
							    
							    
							    
							    



COMMENTS