या लेखात, आपण GCC TBC ४० श.प्र.मी. स्टेटमेंट ची फॉरमटींग शिकणार आहे.
या ब्लॉगमध्ये, आपण GCC TBC इंग्रजी ४० श.प्र.मी. स्टेटमेंट कसे फॉरमॅट करायचे ते शिकू. फारमॅटींग खालीलप्रमाणे आहे:
1. तुम्हाला डाव्या बाजूच्या एक्सेल शीटच्या प्रश्नाच्या बाजूला दाखवल्याप्रमाणे तेच स्टेटमेंट टाइप आणि फॉरमॅट करावे लागेल. प्रश्नामध्ये ज्या सेलपासून स्टेटमेंट सुरू झाला आहे त्याच सेलपासून आपल्याला उत्तरामध्ये टाईप करायच आहे.
2. सर्वप्रथम स्टेटमेंटचे मुख्य हेडींग टाइप करा.
3. त्यानंतर, तुम्हाला प्रश्न एक्सेल शीटमध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व कॉलम हेडिंग टाइप करावे लागेल. एक्सेल शीटच्या प्रश्नाच्या बाजूला दाखवल्याप्रमाणे सर्व स्टेटमेंट आणि आकडे टाईप करा आणि फॉरमॅटिंग सुरू करा.
4. ४० श.प्र.मी. स्टेटमेंट फॉरमॅटिंगमध्ये, तुम्हाला एक्सेल फॉर्म्युला वापरून प्रश्नपत्रिकेत विचारल्याप्रमाणे सरासरी, बेरीज, किमान आणि कमाल मूल्यांची गणना करावी लागेल.
5.फॉरमॅटींग:
a. कालमची रुंदी अडजस्ट करा जेणेकरून सेलमधील सर्व सामग्री स्पष्ट आणि योग्य दिसेल.
b. परटीकुर्लसच्या कॉलमची रुंदी योग्यरित्या अडजस्ट करा.
c. स्टटीस्टीकल डाटा कॉलमची रूंदी समान असायला हवी, त्यासाठी तुम्हाला ते कॉलम एकदाच सिलेक्ट करून त्यांची रूंदी एकदाच अडजस्ट करायची आहे.
d. मेल हेडींग ला सिलेक्ट करा आणि Home Tab > Font Group > Font Size मधून १६ करा. त्यानंतर Home Tab > Font Group > Bold मधून त्याला बोल्ड करा आणि Underline करा आणि त्यानंतर मर्ज आणि सेंटर कमांड लावा.
e. त्या रोव च्या खाली, तुम्हाला मिळेल (Fig. in 000), ती रोव B4 ते H4 निवडा आणि Home Tab˃ Alignment Group ˃ Merge and Center आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून मर्ज ॲक्रोस निवडा आणि राईट अलायमेंट लागू करा.
f. परटीकुर्लस आणि सर्व सांख्यिकीय डेटा प्रश्नाच्या बाजूला दर्शविल्याप्रमाणेच टाइप करा.
g. त्यानंतर सिरीयल नंबर व त्याखालची सेल म्हणजे सेल B6 सिलेक्ट करा आणि मर्ज आणि सेंटर लागू करा. त्यानंतर सिलेक्शन तसेच ठेवून बोल्ड कमांड लागू करा. त्यानंतर परटीकूर्लस आणि त्या खालची सेल म्हणजे सेल C6 सिलेक्ट करा आणि त्यावर मर्ज आणि सेंटर लागू करा आणि बोल्ड करा. त्यानंतर दोन सेल B5 आणि सेल F5 सिलेक्ट करा आणि त्यावर मर्ज आणि सेंटर लागू करा आणि बोल्ड करा. सेल G5 आणि सेल H5 वर सुध्दा सारखी फॉरमॅटींग लागू करा.
h. सेल B7 मध्ये अनुक्रमांक 1 टाइप करा. अनुक्रमांक टाइप करण्यासाठी तुम्हाला Home tab˃ Editing Group˃ Fill वरून Fill कमांड वापरावी लागेल. फिलच्या ड्रॉप-डाउन बाणातून, तुम्हाला मालिका निवडावी लागेल. मालिकेचा डायलॉग बॉक्स दिसतो. त्या डायलॉग बॉक्समध्ये सिरीजमधील कॉलम निवडा आणि स्टार्ट व्हॅल्यू 1 आणि स्टॉप व्हॅल्यू 8 द्या आणि ओके दाबा आणि सीरियल नंबर संबंधित कॉलममध्ये म्हणजेच सेल B8 ते B14 मध्ये आपोआप भरले जातील.
i. प्रश्नपत्रिकेत दाखवल्याप्रमाणे तपशील टाईप करा आणि त्याच इंडेंट फक्त एक नी वाढवा. कालम D मध्ये लीडर डॉट टाईप करा आणि त्यांना सेंटर अलाईमेंट द्या.
j. सेल E5 मध्ये मेन हेडिंग टाईप करा आणि सबहेडींग सेल E6 मध्ये टाईप करा आणि सेंटर अलायमेंट टाईप करा. सेल E5 आणि F5 एकाच वेळी सिलेक्ट करा आणि त्याला मर्ज आणि सेंटर अलायमेंट लावा. त्यानंतर त्याच सिलेक्शन ला बोल्ड करा. त्यानंतर सगळा स्टॅटिस्टिकल डाटा टाईप करा आणि नंबर वेगळे करण्यासाठी कॉमा सेपरेटर वापरा.
k. सेल G5 मध्ये मेन हेडिंग टाईप करा आणि सबहेडिंग सेल G6 आणि H6 मध्ये टाईप करा आणि त्यानंतर त्यांना सेंटर अलायमेंट लागू करा. सेल E5 आणि F5 ला एका सोबत सिलेक्ट करा आणि मर्ज आणि सेंटर कमांड लागू करा.
l. त्यानंतर सगळे कॉलम हेडींग सिलेक्ट करा आणि त्यांना ऑल बार्डर लावा. सेल B7 ते H14 सिलेक्ट करा आणि ऑउटसाईड बॉर्डर लावा. सेल C17 ते D14 ला सुध्दा सिलेक्ट करा आणि त्यांना आऊटसाईड बार्डर लावा. बॉर्डर्सच्या ड्रॉप-डाउन ॲरोमधून अधिक बॉर्डरवर जा, फॉरमॅट सेलचा डायलॉग बॉक्स उघडेल आणि त्यातून तुम्हाला इनसाईड वर्टीकल बार्डर निवडा आणि ओके दाबा.
m. एक्सेल फॉर्म्युला वापरून तुम्हाला संबंधित सेलमध्ये विचारल्याप्रमाणे बेरीज, सरासरी, किमान आणि कमाल मूल्यांची गणना करावी लागेल.
n. सगळ स्टेटमेंट सिलेक्ट करा आणि त्याची वर्टिकल अलायमेंट मिडल करा आणि रोव हाईट २५ करा.
GCC TBC इंग्रजी 40 श. प्र. मी. चे फॉरमॅटेड स्टेटमेंट खाली दिले आहे -
मार्किंग:
१. हेडिंग आणि आकडे - ०.५ +०.५ मार्क
२. कॉलम हेडिंग आणि सेंटर अलायमेंट - ०.५ मार्क
३. बाकी सेल अलायमेंट - ०.५ मार्क
४. कॉलम विड्थ - ०.५ मार्क
५. बार्डर - ०.५ मार्क
६. फन्क्शन वरील प्रश्न - २ मार्क
							    
							    
							    
							    


COMMENTS