आज आपल्या देशात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोंबर 2014 ला स्वच्छतेचे महत्त्व जाणून स्वच्छ भारत अभियान सुरू केले. संत गाडगेबाबां सारख्या महान संतांनी देखील स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे.
स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात जरी असले तरी स्वच्छतेचे पालन सर्वांसाठी आवश्यक आहे. स्वच्छता बऱ्याच प्रकारची असू शकते जसे सामाजिक, व्यक्तिगत, वैचारिक इ. आपण प्रत्येक क्षेत्रात स्वच्छतेचे पालन करायला हवे. विचारांची स्वच्छता आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवते, व्यक्तिगत स्वच्छता आपल्याला रोगापासून वाचवते. आणि सामाजिक स्वच्छता एक सशक्त समाज घडवते. म्हणून स्वच्छतेसाठी आपल्याला नेहमी कार्यरत राहायला हवे.
व्यक्ती लहान असो किंवा मोठा, प्रत्येक वयात स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असते. जसे जेवणाच्या आधी हात धुणे, दररोज अंघोळ करणे, दातांची स्वच्छता ठेवणे, खाली तसेच उघळ्यावर पडलेल्या वस्तू न खाणे, घराला स्वच्छ ठेवणे, घरात सूर्यप्रकाश तसेच हवा खेळती राहू देणे, वाढलेली नखे कापणे आणि स्वच्छ करणे, घरच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे, शाळा कॉलेज इ. सार्वजनिक स्थानावर कचरा न फेकणे इत्यादी गोष्टी स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत. नेहमी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा. या सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचे पालन करून आपण आपली स्वच्छता ठेवू शकतो.
स्वच्छतेचे भरपूर फायदे आहेत जसे स्वच्छतेची सवय आपल्याला खूप साऱ्या रोगांपासून संरक्षित ठेवते. कोणताही रोग शरीराला अपायकारक तर असतोच पण या सोबत दवाखान्याचा खर्च देखील वाढवतो. खराब पाणी आणि अन्न खाल्याने पिलिया, टायफॉइड, कॉलेरा सारखे रोग होतात. जास्त वेळ पडलेल्या खराब पाण्यात डास वाढायला लागतात. जे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या रोगांना आमत्रण देतात.
व्यर्थ रोगांना वाढवण्या पेक्षा, आपण स्वच्छतेकडे लक्ष दिलेले केव्हाही चांगलेच. आणि म्हणून सर्वांनी स्वच्छतेचे नियम पाळायला हवेत. व्यक्तिगत स्वच्छता सोबत वैचारिक स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे. विचारांची स्वच्छता असेल तर आपण एक चांगले व्यक्ती बनतो. असा व्यक्ती स्वतःच्या विकासासोबत समाजाचा सुद्धा विकास करतो.
भारत शासनाने स्वच्छतेचे महत्व समजून स्वच्छ भारत अभियान देखील सुरू केले आहे. या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 ला गांधी जयंती च्या दिवशी सर्वप्रथम झाली होती. पण फक्त शासनाच्याच प्रयत्नाने कुठलेही अभियान यशस्वी होत नाही, तर या साठी देशातील लोकांची पण सोबत व मदत लागते. म्हणून सर्वच नागरिकांना मिळून स्वच्छतेचे पालन करायला हवे व जास्तीत जास्त लोकांना स्वच्छते विषयी जागृत करायला हवे.
COMMENTS